अगस्त २००० मध्ये पूज्य बापूजी नी सुरेशानंदजीना युनैटेड नेशनच्या वर्ल्ड रिलीजस आँरगेनाइजेशन द्वारा आयोजित मिलेनियम सम्मीट मध्ये आपला प्रतिनिधि म्हनून पाठवले
जानेवारी १९८४ मध्ये सुरेशानन्दजी ना वयाच्या १३ व्या वर्षी पूज्य बापूजींद्वारा दिक्षेचा प्रसाद मिळाला.
श्री बापूजींचा विशेष दूत म्हणुन श्री सुरेशानंदजीनी बरेच सत्संग पश्चिमेच्या न्यूयार्क , अटलांटा , शिकागो , कैलिफोर्निया , बोस्टन ,टोरंटो, कनाडा येथील आध्यात्मिक बाबतीत उपाशी लोकांना दिले. त्यांचे भजन व कीर्तन युक्त सत्संग ऐकून हजारो लोक साधे व आरोग्यदाई जीवन जगू लागले. त्यानी योग, ध्यान व प्राणायामाची बरीच शिबिरे घेतली.
पूज्य बापूजींच्या अशिर्वादाने श्री सुरेशानंदजी भारताच्या विभिन्न शहरात नेहमी सत्संग करीत असतात
स्वामी सुरेशानान्दजी द्वारा स्वता:ची आत्मकथा अशी सांगितली आहे : माझे सुरवातीचे आयुष्य फारच दुःखी आणी नारकीय होते. अत्यंत दुःखी असताना असेही वाटायचे की देवाने आता माझे आयुष्य संपवून टाकावे. मी २ वर्षांचा आसतांना माझी आई वारली. मी, माझा भाऊ व २ बहिणी असे चौघेही अत्यन्त दुःखी झालो. पिताजींनी दूसरे लग्न केले. माझ्या सावत्र आईला २ मुले झाली. आम्हाला असे वाटायचे की ती खरच सावत्र आईसारखी वागते आणि म्हणुनच मी व माझा भाऊ घरून पैसे चोरून पळून जायचो. आम्हाला वेळ कसा घालवायाचा हे कळत नव्हते. मग आम्ही सिनेमा बघायाचो, उनाड पोरांबरोबर मैत्री करून वेळ घलवायाचो. जेव्हा घरात पैसे नसायचे अथवा ते गुप्त ठिकाणी ठेवलेले असयाचे, तेव्हा घरातील वाडीलांच्य़ा दुधाच्या धंन्द्याची ताम्ब्याची मोठी भांडी चोरून विकायाचो आणी मग उगाचच भटकत रहायचो. उनाड पोरांनी मला विड़ी प्यायला शिकाविली. घरच्यानां वाटले की दोन्ही भावांना अलग अलग केले तर कदाचित सुधारतील. म्हणून भावाला आत्याकडे मद्रासला पाठवले. एकटा रहिल्यावर तर मी घर सोडून जास्तच पळु लागलो. घरचे खुप पैसे बर्बाद केले. कोणीही नातेवाइक मला जवळ करण्यास तय़ार नव्हते. सर्वच माझा तिरस्कार करीत असत.असे दिवस काढत असताना १९८३ सालातील सप्टेम्बर चा पहिला आठवडा उगवला. त्या दिवशी वडीलांनी असे सांगितले की आता या पुढे माझ्यासाठी त्यांच्या घरात जागा नाही. हा माझ्यासाठी खूपच मोठा धक्का होता. आता जावू कुठे ? करू काय ? काहि सुचत नव्हते. असेही वाटले की जावून जीव द्यावा. अशा विचित्र परिस्थितीत मला एकच आधार आठवू लागला, तो म्हणजे कृपाळु श्री सद्गुरुदेवांचा !! ह्रुदयाच्या टोकापसून मी त्यांचा धावा केला. सच्च्या हृदयाची हाक श्री सद्गुरुदेवापर्यंत पोहचाली. दुसरे दिवशी श्री सद्गुरुदेवांच्या प्रेरणेने मी अहमदाबादच्या पवित्र भुमीत पोहचलो. माझ्या साठी कोणा कडेही जागा नव्हती. पण परब्रह्म परमात्मा स्वरुप गुरुदेवांच्या कृपेने त्यांच्या चरणांशी मला जागा मिळाली. जानेवारी १९८४ ची मकर संक्रान्त सर्वात जास्त भाग्यदायक होती. त्या दिवशी श्री सद्गुरुदेवांनी माझ्यावर कृपेचा पाउस दीक्षा रूपाने पाडला. माझ्या जुन्या वाईट सवयी धुवून टाकून मला श्री सद्गुरुदेवंच्या दैवी प्रेमाचा अनुभव मिळाला.
Tuesday, July 15, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment